खानापूर : खानापूर शहर सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसिलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले.
निवेदनात असे म्हटले आहे की, या वर्षी पाऊस हा फार कमी झाला त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले ओसाड पडले आहेत. त्यामुळे यावर्षी गणेश विसर्जन करताना कोणती अडचण येऊ नये त्यासाठी जळगा बंधारा तसेच खानापूर बंधाऱ्याच्या ठिकाणी त्वरित फळ्या घालून पाणी अडवावे.
निवेदनाची दखल घेत खानापूर तहसीलदार साहेबांनी त्वरित मायनर इरिगेशन व मेजर इरिगेशनला फोन करून समस्या सोडविण्याचे आदेश दिले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले, कार्याध्यक्ष श्री. रवी काटगी, सेक्रेटरी श्री. अमृत पाटील, सल्लागार श्री. प्रकाश देशपांडे, श्री. गजानन कुंभार, श्री. अप्पय्या कोडोळी, श्री. बाळू सावंत, श्री. संजय मयेकर, श्री. धनाजी देवलतकर, पिंटू यळ्ळूरकर, किरण तुडयेकर, श्री. प्रकाश काद्रोळी आदी यावेळी उपस्थित होते.