खानापूर : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल महाविद्यालय, बिडी, ता. खानापूर येथील विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत व कसरत करत उत्तम खेळ केला. यामध्ये कु. सुरेखा गिडप्पणावर, विजयालक्ष्मी गाडेकर, कावेरी मालकी, देमक्का हिंडलकर, सरीता भेकणी, राधिका गिडप्पणावर, तेजस्विनी गौडर या विद्यार्थ्यांनींनी डोळ्यांचे पारणे फिटेल असा तालुका आणि जिल्हास्तरावर सांघिक खेळ केला. यामध्ये कु. सुरेखा गिडप्पणावर, विजयालक्ष्मी गाडेकर, देमक्का हिंडलकर या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. तर कु. नागराज पाटील याची उंच-उडीसाठी राज्यस्तरीय निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना पी.ई. शिक्षक के.सी. कांबळे, मंग्यांनकोप्प प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. भोसले सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या एल.पी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष महेश बिडीकर, मुख्याध्यापक डॉ. व्हि.सी. सिंदगी तसेच काॅलेजच्या सर्व प्राध्यापक वर्गाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta