
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याजवळील पास्तोली गावात एका ३८ वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून कोल्हापुरात पळ काढला, अशी फिर्याद मुलीच्या कुटुंबीयांनी मंगळवारी पोलिसांत दिली.
या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, भीमगड अभयारण्यातील पास्तोली गावातील शाहू गावडे या नराधमाने काही दिवसांपूर्वी मुलीवर अत्याचार केला होता. शाहू गावडे याच्याविरुद्ध खानापूर पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहू गावडे याला पकडण्यासाठी खानापूर पोलिसांचे एक पथक कोल्हापुरात गेले असता खानापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पीडित मुलीवर खानापूर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पीडितेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयातील पॉस्को कक्षात पाठवण्यात आले आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. याप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून डीवायएसपी रवी नाईक, खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta