Thursday , March 5 2026
Breaking News

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; शिवोलीचा युवक जागीच ठार

Spread the love

 

खानापूर : बेळगावहून खानापूरकडे दुचाकीवरून जात असताना देसूर अल्मानजीक महामार्गावर रस्त्या बाजूला थांबलेल्या एका निलगिरी लाकडे वाहू ट्रकला दुचाकीची जोरात धडक बसल्याने शिवोली येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव पंकज नारायण जांबोटकर (वय 23) रा. शिवोली ता. खानापूर असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, मयत पंकज हा दररोज गावाहून किणये रोडवरील नावगे क्रॉस जवळ एका कंपनीत कामाला जात असे. आज आपले काम संपवून तो बेळगाव येथे मोबाईल खरेदी करण्यासाठी गेला होता. येण्यास उशीर झाल्याने त्याच्या वडिलांनी अपघातापूर्वी अर्ध्या तास आधी त्याला फोनवर संपर्क करून विचारले. पाऊस येत असल्याने अर्ध्या तासात येतो असे पंकजने सांगितले. पण नियतीचा काळ वेगळाच होता. वाटेत येताना देसूर जवळील अल्मा कंपनीच्या कारखान्याजवळ बेळगाव खानापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या एका निलगिरी वाहू ट्रकला दुचाकीची पाठीमागून जोरात धडक बसल्याने तो रस्त्याकडेला उडून पडला. त्याच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाल्याचे समजते. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. तो शिवोली येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण गोविंद जांबोटकर यांचा एकुलता चिरंजीव होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे शिवोली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *