
खानापूर : मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा शनिवार ता. 25 फेब्रुवारीला होणार असून तालुक्यातील विध्यार्थ्यानी परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे.
सदर परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक अश्या दोन गटात होणार आहे. परीक्षेला 10 वाजता खानापूरातील रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात सुरवात होईल. खानापूर तालुक्यातील विध्यार्थ्यानी
गुरुवार दि. 23 पर्यंत दैनिक पुढारी कार्यालय वाझ बिल्डिंग, मिनी विधानसौधसमोर, खानापूर येथे नावे नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी नारायण कापोलकर (मो 9449582080), वासुदेव चौगुले (9901070234), ईश्वर बोबाटे (9945384501) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta