खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे
दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत कुटुंब पत्रिका, अहवाल पत्रकाबाबत माहिती दिली. माजी अध्यक्ष मोहन कुंभार मार्गदर्शन करताना म्हणाले, कुंभार कुटुंब पत्रिका व जमा खर्चाचा अहवाल किती महत्वाचा आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे समाजात मंडळाबाबत पारदर्शकता निर्माण होते. सर्व सदस्य व समन्वयकांनी दिलेली जबाबदारी चोखपणे बजावावी. बैठकीत सोमनाथ कुंभार, नागाप्पा उत्तुरकर, सातेरी कुंभार, अर्जुन कुंभार, साईराम चेट्टी, धोडिंबा कुंभार यांनी आपली मते व्यक्त केली.
बैठकीला बेळगाव, खानापूर, गर्लगुंजी, फुलेवाडी, विश्रांतवाडी, तोपिनकट्टी, सिंगीनकोप, लालवाडी, हलकर्णी, असू, जगलबेट, दांडेली, हल्याळ, गोधोळी, नंदगड, घोटगाळी गावातील सदस्य उपस्थित होते.