Wednesday , December 10 2025
Breaking News

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत ग्रुप व इनरव्हिल क्लबवतीने शैक्षणिक मदत

Spread the love

 

खानापूर : ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप व इनरव्हिल क्लब बेळगांवच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत.

भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या खानापूर तालुक्यापासून 30/31 किमी दूर गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची माहिती राहुल पाटील यांना मिळाली. सदर गावात सरकारी सुविधांची वानवा आहे. वाहनांची सोय नसल्याने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 15/17 किमी वरील शिरोली येथे दररोज जावे लागते तसेच येथील नागरिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर जातायेताना पायी चालतचं जंगलातील रस्त्याने मुख्य रस्त्यापर्यंत येऊन मिळेल त्या वाहनांनी पुढे जावे लागते, तेही आजूबाजूला वावरणाऱ्या जंगली श्वापदांच्या भितीखाली.
या शाळांची माहिती ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपचे राहुल पाटील यांच्यामार्फत मिळाल्याने इनरव्हिल क्लब बेलगांमने काही स्कूल बॕग देऊ केल्या, उर्वरीत स्कूल बॕगसह सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन/पेन्सिली, खोडरबर, शार्पनर व स्केल असे शैक्षणिक साहित्य ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने देण्यात आले.
शाळेंच्या वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले, हे गुच्छ शाळेच्या सभोवती मिळणाऱ्या फुलां-पानांपासून विद्यार्थ्यानी बनवलेले होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले, शैक्षणिक साहित्य मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाने फुलला. शाळेतर्फे IWC च्या अध्यक्षा मंजीरी पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी मंजीरी पाटील, प्रिती चिंडक, लिना शहा, निवृत्त शिक्षक वायपी नाईकसर व इतरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी सामाजिक कार्यकर्ते डीके निंबाळ, ॲड. सुधिर चव्हाण, प्रशांत बिर्जे, गौरी गजबर, प्रविण होसमणी, भारती वाढवी, प्रविन बीके, डाॕ. तानाजी पावले, हणमंत कलादगी, किरण नायक, वायपी नाईक, भालचंद्र पाटील वा सागर सुतार यांनी खूप मोलाची मदत केली.
यावेळी राहुल पाटील यांनी ‘ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने व आपल्या सहकारी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजूंना शैक्षणिक साहित्याची शक्य ती मदत करत राहू, असे सांगितले.
पाली/मेंडील शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा माळीन, मोहन पाटील, आरती चौगुले, मेंडील शाळेचे नामदेव अनगोळकर, हेमाडगा शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता नाईक, किशोर शितोळे असा शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *