
कारवार : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या मराठा असल्याने त्यांना उद्देशून उत्तर कन्नडमध्ये मराठा पिडा कशाला आणला असा अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान कुमठा येथील भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एच. नायक यांनी कुमठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेस पक्षाने मराठा समाजाला यावेळी नेतृत्व देत उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने यावेळी काँग्रेस पक्षाला अभय दिले असून चांगला पाठिंबाही मिळत आहे. मात्र मराठा समाजाला काँग्रेस पक्षाने दिलेली ही संधी भाजप कार्यकर्ता श्रीकांत हेगडे अंतरावली यांना खटकल्याने त्यांनी सोशल मीडियावर मराठी पिंडा असा शब्द वापरून मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप करून कुमठा येथील काँग्रेसचे उपाध्यक्ष आर. एच. नायक यांनी कुमठा पोलीस ठाण्यात श्रीकांत हेगडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष आर. एच. नायक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ त्यांनी शनिवारी कारवार प्रेस हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली, हा व्हिडिओ काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे सूरज नायक यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. याला कुमठा तालुक्यातील अंत्रवल्ली येथील भाजपचे श्रीकांत हेगडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अपशब्द वापरून “मराठी पिंडा” असे म्हटले. असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
आर. एच. नायक म्हणाले, मराठी पिढा ही असंवैधानिक आणि जाती समाजाचा अपमान करणारी टिप्पणी असल्याने त्याला अटक करून खटला चालवावा, अशी मागणी केली. श्रीकांत हेगडे अंतरावली यांच्या विरोधात कुमठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भात पक्ष आणि उमेदवार एकमेकांच्या विरोधात असणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्या जातीला लक्ष्य करून काँग्रेसच्या उमेदवार अंजलीताई निंबाळकर यांचा अपमान करणे अक्षम्य आहे. जाती-जातींमध्ये तेढ पेरणाऱ्या भाजपने पुन्हा पुन्हा तेच सुरू ठेवले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक आणि असभ्यपणे शिवीगाळ करणाऱ्यांना ही तक्रार धडा ठरावी. या निवडणूक अधिकाऱ्यांनीही लक्ष घालून कारवाई करावी, असा आग्रह आर. एच. नायक यांनी धरला. यावेळी उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे भाजपाला तो खटकत असल्याने ते सहन झाले नाही त्यामुळे भाजपच्या त्या कार्यकर्त्याने मराठा समाजाला टार्गेट करून अशा पद्धतीने बदनाम करण्याचा हा प्रकार अवलंबला असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. यावेळी काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे सुरज नायक, अजय सिगली, अशरफ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta