
खानापूर : उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 10 रोजी चापगावसह विविध भागात प्रचार दौरा व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी 10.30 वाजता चापगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यानंतर सकाळी 11 वाजता बेकवाड, दुपारी 12.30 वाजता हलशी दुपारी 1.30 वाजता माडीगुंजी येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हंदूर, 7 वाजता गंदीगवाड, रात्री 8 वाजता तोलगी या ठिकाणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तरी या वेळापत्रकानुसार त्या भागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. काँग्रेस उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावाला धावती भेट देऊन कार्यकर्त्यांचा संपर्क घेण्याचा उद्देश समोर ठेवला आहे.

उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघ मोठे असल्याकारणाने सर्वत्र वेळीच पोहोचणे अडचणीची आहे. त्यामुळे या धावती भेटीतून शक्य होईल तितक्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निवडून आणण्यासाठी मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्या आपल्या तालुक्यातील माजी आमदार व विकासाभिमुख नेत्या म्हणून परिचित आहेत. त्यामुळे तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. उत्तर कन्नड मतदार संघामध्ये उर्वरित तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने खानापूर तालुक्यातील मतदान हे अधिक अपेक्षित असल्याने संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta