Sunday , September 8 2024
Breaking News

हैदराबादचा पंजाबवर २ धावांनी निसटता विजय

Spread the love

 

पंजाबच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने निसटता विजय मिळवला आहे. अखेरच्या चेंडूवर हैदराबादने पंजाबवर अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा संघासाठी तुफान खेळी केली. या दोघांनी ५० अधिक धावांची शानदार भागीदारी रचली पण संघाला विजय मिळवून देण्यात अवघ्या दोन धावांनी ते चुकले.

हैदराबादचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला २० षटकांत ६ गडी गमावून १८० धावा करता आल्या. शेवटच्या २०व्या षटकातील थरार या सामन्यात पाहायला मिळाला.

२०वे षटक टाकण्यासाठी जयदेव उनाडकट आला होता. तत्त्पूर्वी या पंजाबच्या शिलेदारांनी १९व्या षटकात १० धावा केल्या होत्या. शेवटच्या ६ चेंडूत पंजाबला २९ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर आशुतोष शर्माने षटकार लगावला. पुढचे दोन्ही चेंडू वाईड होते. आता २१ चेंडूत ५ धावांची गरज होती. पुढच्या चेंडूवर आशुतोष पुन्हा एक षटकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेण्यात यश आलं. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन धावा घेण्यात यश आलं. आता २ चेंडूत ११ धावा हव्या होत्या. पाचवा चेंडू उनाडकटने पुन्हा वाईड टाकला. पुढचा चेंडू पु्न्हा आशुतोषने उचलला, चेंडू खूप वर गेला पण त्रिपाठीने त्याचा झेल सोडला तरीही या दोघांना एकच धावा घेता आली. एका चेंडूत ९ धावा हव्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर शशांकने षटकार लगावला पण २ धावांनी पंजाबने सामना गमावला.

शशांक सिंगने २५ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर आशुतोष शर्माने१५ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३३ धावा केल्या. सॅम करन (२९) आणि सिकंदर रजा (२८) यांनी भागीदारी रचत सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण जास्त काळ मैदानात टिकू शकले नाही. तर शिखर धवन १४ धावांवर बाद झाला. प्रभसिमरन सिंग अवघ्या ४ धावा करत बाद झाला तर बेयरस्टोला खातेही उघडता आले नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने २ विकेट घेतले तर कमिन्स, नटराजन, नितीश रेड्डी आणि उनाडकट यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या डावाची सुरुवात फारशी चांगली करता आली नाही. संघाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज एकामागून एक माघारी परतले. मात्र यानंतर नितीश रेड्डी आणि अब्दुल समद यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांनीही पंजाबसमोर चांगलीच फटकेबाजी केली. रेड्डीने ३७ चेंडूत ६४ तर समदने १२ चेंडूत २५ धावा केल्या. शेवटी शाहबाज अहमदनेही काही चांगले फटके लगावले आणि सतत विकेट गमावूनही हैदराबादने ९ बाद १८२ धावांचा आकडा गाठला.

पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ४ विकेट्स घेत २९ धावा दिल्या. तर सॅम करन आणि हर्षल पटेलने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. रबाडालाही एक विकेट मिळवण्यात यश आले.

About Belgaum Varta

Check Also

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक

Spread the love  पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *