बेळगाव : बेळगाव शहरात रमजान सणाची ईद नमाज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंजुमन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे असे अंजुमनचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी सांगितले.
आज मंगळवारी सायंकाळी अंजुमन सभागृहात हिलाल कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शहराचे मुफ्ती, मौलाना आणि समाजप्रमुख उपस्थित होते. आज चंद्र न दिसल्याने बुधवारी ३० रोजे पूर्ण करून गुरुवारी रमजान ईद साजरी कार्यांचा निर्धार करण्यात आला. यावेळी आ. आजू सेठ यांनी सर्व बेळगावच्या जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध जमातीचे प्रमुख उपस्थित होते.