खानापुर : खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे.
प्रारंभी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी
बोलताना सरदेसाई यांनी मराठी भाषिकांचे हक्क अबाधित राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे मात्र सातत्याने मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज निर्माण झाली असून घटनेनुसार सर्वांना हक्क मिळाले पाहिजेत असे मत व्यक्त केले. यावेळी राजाराम देसाई, नागेश भोसले, सदानंद परशुराम मादार, स्वप्नील पुन्नाप्प मादार, प्रभाकर तुकाराम मादार, सर्व कौंदल, संदेश प्रल्हाद कोडचवाडकर, सचिन राघोबा मादार, राघोबा मादार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta