बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उचगाव ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य एल डी चौगुले आणि पत्रकार अशोक चौगुले तसेच सीईओ मदन बामणे उपस्थित होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत लक्ष्मी झेंडे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी एल डी चौगुले यांनी बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि त्याघटनेनुसार आज स्वतंत्र भारताची वाटचाल चालू असल्याचे सांगितले. त्यानंतर अशोक चौगुले आणि मदन बामणे यांचीही समयोचित भाषणे झाली.
सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पा भेंडवाडे यांनी केले.
यावेळी संजीवीनी फौंडेशनमधील रुग्ण आणि कर्मचारी उपस्थित होते.