खानापूर : चन्नेवाडी येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते, यासाठी मंगळवार दिनांक २८ मे रोजी श्रीमती कुडची यांनी सीआरपी बागवान, यल्लाप्पा कोलकार, सिडब्लूएसन कम्मार यांच्यासह चन्नेवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली व त्या संदर्भात माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी यांना अहवाल पाठवून दिला असून श्रीमती कुडची यांनी शाळा सुरू करण्या संदर्भात सकारात्मकता दाखविली असल्याने गावकरी व पालवर्गाने समाधान व्यक्त केले.
बुधवार दिनांक २९ मे रोजी पुन्हा गावकरी व पालकांनी बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी व शिक्षक नेमणुकीचा आदेश देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, शिक्षक फोंडुराव पाटील, किरण पाटील, पांडुरंग ऱ्हाटोळकर, कल्लाप्पा पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, शंकर पाटील, ईश्वर (बबलू) पाटील, राजू पाटील, संतोष पाटील, विनोद आंबेवाडीकर, रोहन लंगरकांडे, भूपाल पाटील, महांतेश कोळूचे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta