खानापूर : दिनांक 6 व 7 जून 2024 रोजी उडपी या ठिकाणी कर्नाटक राज्य पातळीवरील ॲथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा उडपी जिल्हा हौशी ॲथलांटिक स्पर्धा संघटना उडपी यांच्यावतीने संपन्न झाल्या. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील व कुमार भूषण गंगाराम गुरव या खानापूर तालुक्यातील स्पर्धकांनी भाग घेऊन दैत्यमान असे यश संपादन केले आहे. कुमार भूषण गंगाराम गुरव याने 1000 मिटर धावण्याच्या स्पर्धेत अजिंकपद मिळवून सुवर्णपदक संपादन केले आहे तसेच कुमार वैभव मारुती पाटील या स्पर्धकाने 1500 मिटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आणि 5000 मिटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक संपादन केले. या दोन्ही खेळाडूने बेळगाव जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. हे दोन्ही खेळाडू ज्योती ॲथलांटिक स्पोर्ट्स क्लब बेळगावचे खेळाडू आहेत. या खेळाडूंना श्री. एल जी कोलेकर गर्लगुंजीचे ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन व क्लबच्या पदाधिकारी आणि खेळाडूंचे पालक यांचे सहकार्य लाभत आहे. अशीच प्रगती करत पुढील काळामध्ये नॅशनल ॲथलांटिक स्पर्धेकरिता यांची निवड झाली आहे यांच्या कार्यास सर्वांचे आशीर्वाद लाभावे या करिता सर्वत्र अभिनंदन व यशासाठी आशीर्वाद दिला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta