खानापूर (प्रतिनिधी) : हलशीतील (ता. खानापूर) गावचा सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात शुक्रवारी दि. ३१ डिसेंबर रोजी मध्य रात्री अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याची घटना घडली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी नामदेव सोमू गुरव यांच्या सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात साठून ठेवलेल्या ३० पोती भाताच्या गंजीला शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातानी आग लावुन पेटवून दिले. त्यात त्यांचे ३० पोती भाताचे नुकसान झाले.
नामदेव सोमू गुरव हे शनिवारी सकाळी भाताची मळणी घालावी. म्हणून शेताकडे गेले होते. मात्र त्याच भाताच्या गंजीला आग लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. लागलीच त्यांनी ओरडा ओरड करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. काहीनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र जास्तीतजास्त भाताची गंजी जळून गेली होती.
यावेळी घटनास्थळी तलाठी कार्यालयाचे बाबाजान सनदी यांनी भेट देऊन पंचनामा केला.
तर शेतकरी नामदेव सोमु गुरव यांनी नंदगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करत आहेत.
यंदा अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. अशा संकटात असतानाच कोणी अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याने ३० पोती भाताचे नुकसान झाले. त्यामुळे नामदेव गुरव या शेतकऱ्यांचे ५० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्याला सरकारने आर्थिक मदत करून द्यावी. अशी मागणी सर्व थरातून होत आहे.
या घटनेमुळे हलशी भागातून हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …