खानापूर : प्रभूनगर येथील विद्यार्थ्यांना बेळगाव येथील शाळा कॉलेजला जाण्यासाठी आज शनिवार दि. 17 ऑगस्ट रोजी, सकाळपासून एकही बस थांबत नसल्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बस विद्यार्थ्यांनी अडविल्याने बेळगावकडे जाणाऱ्या अनेक बस काही काळ थांबून होत्या. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. शेवटी केएसआरटीसीचे खानापूर डेपो मॅनेजर संतोष बेनकनकोप्प व खानापूर पोलिसांनी जाऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. तसेच नियमित बस थांबविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बस पूर्ववत सुरू झाली.
आज परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला पोहोचण्याची घाई होती. परंतु सकाळपासून एकही बस थांबली नसल्याने प्रभूनगर येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन बस अडविल्या.
Belgaum Varta Belgaum Varta