Thursday , March 5 2026
Breaking News

दोन अस्वलांच्या हल्ल्यात मुंडवाड येथील शेतकरी गंभीर जखमी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मुंडवाड गवळीवाडा येथील शेतकरी विनोद जाधव (वय 46) हे पहाटे आपल्या शेताकडे जात असताना दोन अस्वलानी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविल्याने ते गंभीर झाले रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, आज पहाटे सदर शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना दोन अस्वलानी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी प्रतिकार करून सदर अस्वलापासून आपली सुटका करून घेतली. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे सहाय्यक रवी पाटील यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच रवी पाटील यांनी रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिका त्या ठिकाणी पाठविली. त्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून सदर शेतकऱ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.

खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून संबंधित शेतकऱ्यावर योग्य ते उपचार होण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्याबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *