खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता.२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले जाणार असून दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ९ वाजता कारलगा येथिल संत एकनाथ महाराज सोंगी भजनी भारुड मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा परिसरातील नागरिक व शिवप्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन भगवा चौक, शिवप्रतिष्ठान युवक मंडळ हलशीवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta