खानापूर (वार्ता) : तालुक्यातील गावाचा विकास व्हावा. म्हणून तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
परंतु भुरूनकी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीची ग्रामसभा केवळ नोडल अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे सोमवारी दि. 10 रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा रद्द करण्यात आली.
ग्रामसभा म्हणजे सामान्य नागरिकांना मिळणारा न्याय असतो. म्हणून ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेला नागरिक उपस्थित राहतात. मात्र सरकारने नेमून दिलेला नोडल अधिकारी बेजबाबदारपणे ग्रामसभेला दांडी मारतो. त्यामुळे गावच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा. असाच प्रकार भुरूनकी ग्राम पंचायतीत नोडल अधिकारी वर्गाच्या बेजबाबदारपणामुळे दिसून आला.
सोमवारी सकाळी 10 वाजता गावच्या नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन ग्राम पंचायतीच्या सभागृहात दाखल झाले.
गावचा विकास व्हावा. यासाठी वॉर्ड सदस्यांशी चर्चा करून सरकारच्या निधीचा योग्य लाभ घेणे हा ग्रामसभेचा उद्देश आहे. मात्र नोडल अधिकारीच दांडी मारतो.
तेव्हा उपस्थित नागरिकांतून उद्रेक होतो. व नागरिक संतापून जातात.
अशा अधिकार्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी जनतेतून मागणी केली जाते.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्यांना पुन्हा ग्रामसभा घेण्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल. असे सांगून गावातून कामे बंद ठेवून आलेल्या नागरिकांना माघारी पाठवले.
त्यामुळे भुरूनकी गावासह ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकातून नाराजी पसरली. शेवटी ग्रामसभा पुढे ढकलण्याचा ठराव करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील अशा अधिकारीवर्गाला चांगली अद्दल घडवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.