खानापूर : मराठा मंडळ संचलित पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला समस्त शिक्षकवृंदाला दिला असून भारतीय शेतकरी आणि जवान यांच्याप्रती आदर भावना कायम ठेवण्यास उपकृत केले आहे. म्हणूनच आज येथील विद्यार्थिनी व शिक्षक एकमेकांना भेटताना “जय हिंद” म्हणून मानवंदना देतात. याचाच अर्थ असा की, पहिला देश वंदन, सैनिक आदर व भूमी पुत्र आभिमान! देशाविषयीची तळमळ, देश रक्षण याबद्दल आदर निर्माण करणे हे शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. ते या शिक्षण संस्थेत दिवसागणिक बहरताना दिसत आहे. ही विचारधारा इथे बहरताना जाणवते आहे व मोठ्या प्रमाणात यश ही मिळत आहे.
आज देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना, नोकरी मिळणं त्यातल्या त्यात भारतीय सैन्यात भरती होणे ही सोपी गोष्ट नाही. पण मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील विद्यार्थिनींनी अनेक आव्हानात्मक संकटाचा सामना करीत, आपल्या ज्ञानाचे व शारिरीक क्षमतेचे निकष लावत भारतीय सैन्यात मानाचे स्थान मिळवित आहेत.
हे यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत व सराव यांची सांगड घालत कुमारी स्वाती पाटील, कुमारी पूनम गुरव व श्रृती पाटील या विद्यार्थिनी भारतीय सैन्याचा वेश परिधान करून कर्तव्य शिध्दिस पात्र ठरल्या आहेत. यांची नियुक्ती सीआयएसएफ या महत्त्वपूर्ण खात्यातमध्ये झाली असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या देशसेवेत रुजू होणार आहेत. यानिमित्त ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून या विद्यार्थिनींचा गुणगौरव कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिनंदन केले. सदर यशस्वी विद्यार्थिनींना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या असून संचालक शिवाजीराव पाटील, परशरामअण्णा गुरव यांनी कौतुक केले आहे. याप्रसंगी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक एन ए पाटील, टी आर जाधव, श्रीमती एस सी कणबरकर, एम वाय देसाई, जे एफ शिवटणकर, पी व्ही कार्लेकर, आर व्ही मरी तमन्नावर, ऋतुजा पाटील, आरती नाईक, दिपाली निडगलकर, सरोजा खांबले व कर्मचारी जोतिबा घाडी, चित्रा अर्जुनवाडकर व समस्त विद्यार्थीगण उपस्थित होता.