
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. महांतेश गुंजीकर (वय 27), खासबाग बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलसानी दिलेली माहिती अशी की, मृत हा एलजी कंपनीचा कर्मचारी असून शनिवारी सायंकाळी एलजी कंपनीच्या बेळगाव शाखेतील 22 कर्मचाऱ्यांसोबत पार्टी करण्यासाठी रिसॉर्टमध्ये गेला होता. रविवारी दुपारी तो जलतरण तलावात उतरला होता. त्यावेळी महांतेश गुंजीकर यांचा स्विमिंग ट्यूबमध्ये गुदमरून मृत्यू झाला. घटनेनंतर महांतेशच्या मित्रांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला व त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयासमोर मृताच्या कुटुंबीयांनी एकच गर्दी केली होती. खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta