खानापूर : तालुका कृषक समाजासाठी 2025 ते 2029 या कार्यकाळातील कार्यकारी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सभा 31 डिसेंबर 2024 रोजी खानापूरच्या सहाय्यक कृषी संचालक कार्यालयात आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कृषी संचालक आणि पदनिर्दिष्ट सचिव श्री. सतीश प्रकाश माविनकोप्प होते. त्यांनी बिनविरोध निवड झालेल्या 15 कार्यकारी सदस्यांचे स्वागत करत अभिनंदन केले.
सभेदरम्यान, निवडणूक प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे उपस्थित सदस्यांना समजावण्यात आली. त्यानंतर कार्यकारी सदस्यांनी एकमताने पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली:
अध्यक्ष: श्री. कोमल पद्मप्प जिनगोंड
उपाध्यक्ष: श्री. रमेश महादेव पाटील
खजिनदार: श्री. ईरन्ना नागप्पा हट्टीहोळी
प्रधान सचिव: श्री. गंगाधर केदारी होसूर
जिल्हा प्रतिनिधी: श्री. कृष्णाजी भीमाजी पाटील
सहाय्यक कृषी संचालकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी कोमल जिनगौड, जोतिबा रेमानी, विजय कामत, रमेश पाटील, सुरेश देसाई, कृष्णाजी पाटील, मंजू आळवणी, पारिष मुतगी, इराप्पा कनबर्गी, बाहुबली अनिगोळ, रुद्रप्पा करेंनवर, निंगाप्पा दस्तीकोप, ईरन्ना नागप्पा हट्टीहोळी, गंगाधर होसुर, आणि गोविंद देसाई हे सर्वजण उपस्थित होते.