
खानापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी खानापूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामधामात खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, संजय कुबल, बसवराज सानिकोप, बाबुराव देसाई, गुंडू तोपिनकट्टी, चेतन मणेरीकर व शेकडो कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत भाजपाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन मणेरीकर यांनी केले. त्यानंतर खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलकेकर, माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल, ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई, युवा मोर्चा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष सुनील मडीमणी, युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले, तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, मल्लाप्पा मारीहाळ, मल्लाप्पा पाटील, मारुती टक्केकर यांची, प्रमोद कोचेरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भाषणे झाली.
शेवटी प्रमोद कोचेरी यांनी सर्वांचे आभार मानले व आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भरमानी पाटील, लैला शुगर एमडी सदानंद पाटील, सुभाष देशपांडे, सदानंद होसुरकर, सुंदर कुलकर्णी, अजित पाटील, मोहन पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, नगरसेवक आप्पया कोडोळी, राजेंद्र रायका, जयंत तिनेकर, महांतेश बाळेकुंद्री, गजानन पाटील, राहुल आळवणी, अशोक देसाई, सीध्दू पाटील, यशवंत गावडे, दिनेश ठोंबरे, तसेच तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते व नागरिक, तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta