
खानापूर : नंदगड येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तसेच सीमा सत्याग्रही पुंडलिक हनमंत चव्हाण ( वय 94 वर्षे) यांचे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव, सुना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
अंत्यसंस्कार सायंकाळी 7.30 वाजता नंदगड स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नंदगड ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta