
खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड गावात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाले.
या घटनेत एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदगड गावातील जनता कॉलनीतील रघुनाथ मादार यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन रघुनाथ मदरा (35), नागराज कोलकार (30), मशानव्वा कांबळे (55), मनुषा कांबळे (26), प्रकृती कांबळे, आराध्या कांबळे हे गंभीर जखमी झाले. नंदगडमध्ये गेल्या आठवडाभरापासून ग्रामदेवीची जत्रा सुरू असताना सिलेंडर स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta