
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टजवळ एका अस्वलाने जनावरे चारायला घेऊन गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, दशरथ वरंडीकर (६०) नामक व्यक्ती आज बुधवारी पहाटे आपली जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले असताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खानापूर वन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta