गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्यांकडून बेळगाव जिल्हा परिवहन मंडळाला निवेदन
खानापूर : गर्लगुंजी ते बेळगाव बस सेवा अनियमित असल्यामुळे गर्लगुंजीहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्यांकडून बेळगाव जिल्हा परिवहन मंडळाला निवेदन देऊन गर्लगुंजी ते बेळगाव सुरळीत बस सेवा चालू करावी अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे दररोज सकाळी साडेसात वाजता गर्लगुंजी ते बेळगाव नव्याने बस सुरू करण्यात यावी जेणेकरून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग होईल व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी वेळेत शाळा, कॉलेजना पोहचू शकतील. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायासाठी व इतर कामांसाठी जाणाऱ्याना देखील सोयीचे होईल अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे गर्लगुंजी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी केली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष ललिता कोलकार, उपाध्यक्ष रेखा कुंभार, गर्लगुंजी ग्रामपंचायत माजी चेअरमन गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, ग्राम पंचायत ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, सुरेश मेलगे, प्रसाद पाटील, अनुराधा निट्टूरकर, अन्नपूर्णा बुरुड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या बस सेवेच्या वेळेत थोडा बदल करून देण्याचे आश्वासन परिवार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना यावेळी दिले.

Belgaum Varta Belgaum Varta