
खानापूर : माणिकवाडी येथील तरुण व्यंकाप्पा मल्हारी मयेकर याचा चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात माणिकवाडी येथील ग्रामस्थ, पंच तसेच मयत व्यंकाप्पा याचे आई-वडील यांनी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भेट घेतली व या खून प्रकरणातील तपासाबाबत चर्चा केली.
यावेळी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर सीपीआय यांना तात्काळ बोलावून घेऊन ग्रामस्थ, पंच व मयत तरुणाच्या आई-वडिलांसमक्ष सविस्तर चर्चा केली.
यावेळी खानापूर सीपीआय यांनी सांगितले की, या गुन्ह्याचा तपास चालू असून काही महत्त्वाच्या रिपोर्टची आपण वाट पाहत आहोत. गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी देवाप्पा गावडे, परशुराम मयेकर, नागेश गावडा, रमेश बेडरे, सहदेव गावडे, परशुराम गोरल, विनायक मयेकर, हणमंत होनगेकर, गंगाराम गावडा, गणपती सुतार यांच्यासह मयत तरुणाचे आई-वडील उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta