Thursday , June 4 2026
Breaking News

महिलांनी चूल आणि मूल न करता स्वावलंबी बनावे : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर

Spread the love

 

खानापूर : धर्मस्थळ स्वसहाय्य संघाचा तालुकास्तरीय महिला मेळावा खानापूर येथील शनाया गार्डन येथे काल दि. 21 सप्टेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.

यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, धर्मस्थळ संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्यामुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहे. त्यांच्या या महिला सबलीकरणाच्या उपक्रमाबद्दल करावे तितके कौतुक कमीच आहे.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडता कामा नये. सध्याच्या परिस्थितीत महिलांचे सबलीकरण होणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांनी चूल आणि मूल न करता स्वावलंबी बनावे.
कार्यक्रमाला तालुका संचालक गणपती नाईक, सतीश नाईक, खानापूर नगराध्यक्षा मीनाक्षी बैलूरकर, दीपा पाटील, अनिता दंडगल, वैष्णवी पाटील, तालुका हेल्थ ऑफिसर महेश तोडसन्नवर, यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी व सभासद वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *