

खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची 57 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील होते. सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. चेअरमन मुरलीधर पाटील यांनी भागधारक शेतकऱ्यांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. बँकेचे सुमारे 97.54 लाख रुपये भाग भांडवल असून यावर्षीची वार्षिक ऊलाढाल रुपये 18.32 कोटी व निव्वळ नफा रुपये 13.14 लाख झाल्याचे सांगितले.

अहवाल वाचन बँकेचे मॅनेजर जयसिंग राजपूत यांनी केले. सभेमध्ये माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, यशवंत बिरजे, माजी चेअरमन विश्वनाथ डिचोलकर, विजय कामत, रणजीत पाटील, गुंडू हलशीकर, कल्लाप्पा घाडी, यशवंत ढबाले यांची समायोजित भाषणे झाली.
सभेला व्हा. चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर, सुदीप पाटील, विरूपाक्ष पाटील, अशोक पाटील, सुभाष गुरव, नारायण पाटील, निळकंठ गुंजीकर, कुतुबुद्दीन बिच्चन्नावर, सुनील चोपडे, यमनाप्पा राठोड, श्रीकांत करंजगी, शंकर सडेकर, सौ. लक्ष्मी पाटील, सुलभा अंबेवाडकर या संचालकांसह संजय कुबल, के. पी. पाटील, महादेव घाडी, विनायक मुतगेकर, राजेश पाटील, विनायक डिचोलकर, म्ह धबाले यांच्यासह सुमारे 700 भागधारक शेतकरी उपस्थित होते.
शेवटी सुनील चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta