
खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे बक्षीस रुपये 11001,व ट्रॉफी, तिसरे बक्षीस रुपये 4001, चौथे बक्षीस रुपये 2101, अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
कबड्डी स्पर्धा सायंकाळी साडेचार वाजता होणार आहेत. विजयी संघांना विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये 21001, व ट्रॉफी,दुसरे बक्षीस रुपये 11001,व ट्रॉफी,तिसरे बक्षीस रुपये 4001, चौथे बक्षीस रुपये 2101, अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
प्रवेश फी रुपये 1501 आहे. तरी संघानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.
तसेच ह्या वर्षी तोपिनकट्टी गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन व सत्कार तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंचे सुद्धा सत्कार करण्यात येणार आहेत.
बेळगाव जिल्हा एक गाव एक संघ व खानापूर तालुका एका बाजूला व दुसर्या बाजूने बेळगाव जिल्हा ईतर संघ असे खो खो व कबड्डी सामने खेळवता येतील.
नाव नोंदणी संपर्क साठी मोबाईल नंबर 9980983121,9108897847
Belgaum Varta Belgaum Varta
