खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे.
१ नोव्हेंबर काळादिन संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta