
बैलूर : छत्रपती संभाजी हायस्कूल, बैलूर येथील २०१३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी तब्बल २३ अत्यावश्यक व अत्याधुनिक विज्ञान उपकरणांची भेट दिली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगाधारित शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
या भेटीत मायक्रोस्कोप, प्रोजेक्टर, मानवी सांगाडा (Human Skeleton), पचनसंस्था (Digestive System), मूत्रसंस्था (Urinary System) मॉडेल, तसेच विविध सायन्स किट्स, सेफ्टी किट्स आणि प्रयोगांसाठी उपयुक्त इतर शैक्षणिक साहित्य यांचा समावेश आहे.
माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी हायस्कूलने आम्हाला दिलेल्या शिक्षणातून आम्ही घडू शकलो. शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
शाळेचे मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही मौल्यवान भेट विद्यार्थ्यांच्या प्रयोगशाळेतील शिकण्यात निश्चितच मोठी भर घालेल.”
या उपक्रमामुळे विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांची आवड वाढून शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta