
जांबोटी (ता. खानापूर) : येथील विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी विद्यालयाच्या विकासात या दालनाची भर पडली आहे. संगणक दालन सुरू करणारे तालुक्याच्या ग्रामीण भागातील हे प्रथम विद्यालय ठरले आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव परशुरामभाऊ नंदीहळ्ळी हे होते.
विद्यार्थिनींच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर कै. किशोर जांबोटकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. साक्षी सुनीत जोशी (पुणे) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले
प्रतिष्ठानचे सचिव श्री. महेश विष्णू सडेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर संचालक विनोद देसाई, नेरसा प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा देसाई, प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार सुनीत जोशी (पुणे) कु. स्वरा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रतिष्ठानच्यावतीने बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याचा पारितोषिक वितरण समारंभ झाला गायन स्पर्धेत कु. त्रिवेणी गोवेकर, कु. दत्तराज सडेकर, कु. घनश्याम परमेकर, अमृता सुतार यांना पारितोषिके देण्यात आली. भाषण स्पर्धेत कु. श्रीगणेश गुरव, नियती गव्हाळकर व राजवीर इंगळे यांनी पारितोषिके पटकावली तर निबंध स्पर्धेत कु. सानिका सुतार, श्रीगणेश गुरव व अनुष्का हळदणकर यांना पारितोषिके देण्यात आली.
सुनिता जोशी अनुराधा देसाई व विजयराव नंदीहळ्ळी तर आज यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. विजयराव नंदीहळ्ळी यांनी नाम फलकाच्या अनावरण केले व संगणक दालनाचे पूजन करून उद्घाटन केले. सहशिक्षक टी एन सडेकर यांनी सूत्रसंचालन केले व सौ सुजाता चलवेटकर यांनी आभार प्रदर्शन केले. महेश साबळे, सुनिल ठानब, संपदा तिरविर, अर्जुन गावडे आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta