Sunday , September 20 2026
Breaking News

गोल्डन जुबली बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धा २७ जानेवारीला

Spread the love

 

बेळगाव : मराठा युवक संघ, बेळगाव या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक रविवारी मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते. ६० वी गोल्डन जुबली बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार विविध ७ वजनी गटांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धा मंगळवार दि. २७ जानेवारीला होईल. जिल्ह्यातील सर्व शरिरसौष्ठवपटूंसाठी स्पर्धा खुली असणार आहे. तसेच राज्यस्तरीय कर्नाटक मिस्टर हरक्युलर्स राज्यस्तरीय टॉप टेन १५ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर एम., आंतरराष्ट्रीय पंच अजित सिध्दण्णावर यांच्या सर्व सहकारी पंचांच्या हस्ते निवड करण्यात येणार आहे. सभेला उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, खजानीस दिनकर घोरपडे, लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, शिवाजी हंगीरगेकर, विनोद हंगिरगेकर, दिगंबर पवार, मनोहर कालकुंद्रीकर, मोहन बेळगुंदकर, सुहास किल्लेकर, आप्पासाहेब गुरव, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, मोहन चौगुले व इतर सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *