Monday , March 9 2026
Breaking News

रंगपंचमीच्या दिवशी मलप्रभा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : रंगपंचमीच्या दिवशी खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी घाटाजवळ एक दुर्दैवी घटना घडली असून गर्लगुंजी येथील एका तरुणाचा नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्लगुंजी येथील संतोष सातेरी बिर्जे (वय 24 वर्षे) हा तरुण रंगपंचमी निमित्त आपल्या काही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी खानापूरजवळील मलप्रभा नदीच्या घाट परिसरात आला होता. आनंदाच्या वातावरणात साजरा होत असलेल्या या सणादरम्यान संतोष पोहण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरला. मात्र काही मिनिटांतच तो पाण्यात दिसेनासा झाला.

सुमारे पाच मिनिटे उलटूनही संतोष वर आला नाही, हे लक्षात येताच त्याच्या मित्रांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. यानंतर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी तत्काळ पोलिस व अग्निशमन दलाला घटनेची माहिती कळवली.
माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मलप्रभा नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आले. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने मृतदेह सापडला आहे.

दरम्यान, बुडालेला संशयित तरुण संतोष बिर्जे हा मशरूम शेतीचा व्यवसाय करीत होता. तो गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे सेक्रेटरी सातेरी बिर्जे यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे गर्लगुंजी गावात शोककळा पसरली असून रंगपंचमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सणाचा उत्साह मावळल्याचे चित्र दिसून येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील कोंगळा परिसरात हत्तीचा उच्छाद; मोठे नुकसान

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरातील कोंगळा गावात गुरुवारी (ता.५) हत्तीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *