Sunday , April 5 2026
Breaking News

सीमाप्रश्नी सह्यांची मोहीम यशस्वी करू : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. बैठकीचे प्रस्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.
खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सीमा भागातील मराठी भाषिकांचे एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. ही अभिनव आणि लोकशाही पद्धतीचे अभियान यशस्वी करण्यासाठी सीमा भागातील प्रत्येक मराठी भाषिकांनी एक पाऊल पुढे टाकत सह्यांच्या माध्यमातून आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, मारुतीराव परमेकर, गोपाळराव पाटील, प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, पांडुरंग सावंत, अजित पाटील, परशराम पाटील, राजेंद्र कुलम, पुंडलिक पाटील, बी. बी. पाटील डी. एम. भोसले, म्हात्रू धबाले, संजीव पाटील, राजाराम देसाई, कृष्णा मन्नोळकर, रणजीत पाटील, पुंडलिक पाटील, ए. आर. मुतगेकर, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण

Spread the love    खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *