खानापूर (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे कणकुंबीत १०२ :२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जाबोटी :४६ .६ मि मी., लोंढा पीडब्लडी ५६ मि.मी., लोंढा रेल्वे ५३ मि. मी., गुंजी :३३.६ मि. मी., असोगा ४४.२ मि. मी. कक्केरी १५. ६ मि.मी., बिडी: १०.६ मि. मी., नागरगाळी ३५.६ मि. मी., तर खानापूर ३६.६ मि. मी पावसाची नोंद झाली आहे.
खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे हवेत गारठा पसरला असुन लोकांना याचा त्रास होत आहे.
खानापूर तालुक्यातील विविध गावात सतत पावसामुळे व हवेत गारठ वाढल्याने सर्दी, ताप सारखे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. खेड्यात लहान मुले थंडी तापाने आजारी पडत आहेत.
सततच्या होणाऱ्या या पावसाने नाले, तलाव नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे.
तालुक्याच्या शिवारात रोप लागवडीचे काम युध्द पातळीवर सुरी आहे.
रोप लागवडीसाठी चिखल करण्यासाठी ट्रॅक्टर, पाव टेलर यंत्रणाना काम जोर आहे. रोप लागवडीच्या कामासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी मजुर मिळविण्यासाठी धडपड करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta