Friday , April 25 2025
Breaking News

नागरदळे येथील एकनाथ हदगल यांना मुंबई रत्न पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड -१९ या जागतिक महामारीमध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन मुंबई येथे *“मुंबई रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चंदगड तालुक्यातील नागरदळेच्या या एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद आहे. “एक हाती मदत” या उपक्रमात त्यांनी सिंहाचा वाटा उचलून आपल्या मुंबईतील लोकांना लाखमोलाचे सहकार्य केले. याची दखल राज्यपालांनी घेणे फार मोठे कौतुकास्पद आहे. नागरदळे गावचे नाव राज्यपालापर्यंत पोहचवून व मोठे करून मानाचा तुरा रोवल्याबद्दल चंदगड तालुक्यात आनंदाचे, वातावरण आहे. एकनाथ हदलग यांचे संपूर्ण चंदगडवासियानी अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाट दुरुस्तीच्या कारणास्तव पंधरा दिवस वाहतुसाठी बंद

Spread the love  चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *