खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच कडक उन्हाळ्याला प्रारंभ झाला. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला जातो. अशावेळी खानापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या मलप्रभा नदीच्या नवीन पुलाजवळील जॅकवेल 50 एच पी विद्युत मोटारीत अचानक बिघाड होऊन पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला आहे.
लागलीच जॅकवेल 50 एच पी मोटर दुरूस्तीसाठी बेळगाव येथे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर शहराला तीन दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
यासाठी खानापूर शहरातील कुपनलिकेच्या पाण्याचा वापर करून खानापूर शहरातील नागरिकांनी नगर पंचायतीला सहकार्य करावे. लवकरात लवकर सार्वजनिक पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नगरपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा खानापूर शहरातील नागरिकांनी पाणीपुरवठा संदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायतीचे चिफ ऑफिसर बाबासाहेब माने व कर्मचारी वर्गाने केले आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …