खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पशुसंगोपन खात्याच्यावतीने गुरूवारी पशुखात्याच्या सभागृहात तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी आधुनिक डेअरी उद्योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराच्या अध्यक्षस्थानी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोडगी होते.
तर पशु तज्ञ डॉ. आमाज अहमद नंदगड, डॉ. आनंद संगमी इटगी यांनी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले.
शिबीराचे उद्घाटन शेतकरी शिवाजी ईश्वर पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत आर. एन. सातगौडा यानी केले.
शिबीरात डॉ. आनंद संगमी यांनी शेतकरी वर्गाने आपल्या दुभत्या जनावरांच्या वासरांचे संगोपन, जोपासणा काळजीपूर्वक करावी. वासरांच्या जन्मापासून त्यांना दुध, पाणी, औषध, लसीकरण याचा वेळेत उपचार करण्यासाठी काळजी घ्यावी. तसेच दुभत्या जनावरांच्या आरोग्याची काळजी वेळीच घ्यावी. गाभण जनावरांच्या आरोग्याकडे कायम लक्ष ठेवावे. त्यांना वेळोवेळी लस देणे. रोग प्रतिबंधक लस देणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे दुभत्या जनावरांच्यासाठी आधुनिक चारा पध्दतीने चारा देणे गरजेचे आहे. तर शेतकरी वर्गाला दुध व्यवसाय लाभदायक ठरू शकतो, असे मार्गदर्शन केले.
या शिबीरात तालुक्यातील जवळपास 30 शेतकरी वर्गाने उपस्थिती दर्शविली होती. हे शिबीर दोन दिवस चालणार आहे.
शिबीराचे सुत्रसंचालन आर. एन. सातगौडा यांनी केले. तर आभार एम. के. जाधव यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta