Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा निर्णय

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते. तर व्यासपिठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायीकमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते.
बैठकीत कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सामान्य नागरिकाना जगणे कठीण झाले आहे. अशातच कर वाढीचा निर्णय हा केवळ तीन वर्षे कर वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे कमाल ३ टक्के कर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील सुविधावर भर देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याचबरोबर बैठकीत ५ लाख ६० हजार रूपयाच्या शिलकी अर्थसंकल्पाही मंजुरी देण्यात आली.
गेल्या तीन वर्षापासून शिल्लक असलेल्या एसएफसी अनुदानाचा विनियोग करताना प्रत्येक नगरसेवकाला विश्वासात घेऊन अत्यावश्यक कामाना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी नगरसेविका मेघा कुंदरगी यानी बैठकीत केली.
नगरोत्थान योजनेतुन पाच कोटी निधीतुन शहारातील हाती घेण्यात येणाऱ्या कामाचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. तर मंजुरी नंतर ऑगस्ट महिन्यात कामाना सुरूवात करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
याचबरोबर गुरू काॅलनीतील गार्डन तसेच मोक्षदाम शेडची दुरूस्ती याबद्दल चर्चा करण्यात आली.
बैठकीला नगरसेवक आप्पया कोडोळी, विनायक कलाल, नारायण ओगले, नारायण मयेकर, हणमंत पुजारी, विनोद पाटील, महमद रफिक, नगरसेविका मेघा कुंदरगी, लता पाटील, मिनाक्षी बैलूरकर, जय भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, शोभा गावडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व शेवटी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *