Tuesday , March 3 2026
Breaking News

शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक याचा स्नेहमेळाव्याचे आयोजन नुकताच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक विठ्ठलराव हलगेकर होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, सेक्रेटरी प्रा. आर. एस. पाटील, श्रीमहालक्ष्मी को- ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, संचालक चांगापा निलजकर, यल्लापा तिरवीर व इतर संचालक तसेच प्राचार्या स्वाती पाठक व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरूवातीला प्रा. मनिषा भोसले यांनी प्रास्ताविक करून स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
तर प्राचार्या स्वाती पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी स्नेहमेळाव्याचे उदघाटन संस्थापक विठ्ठलराव हलगेकर व इतर पाहूण्याच्या हस्ते महालक्ष्मी प्रतिमेचे पुजन करून तसेच दीपप्रज्वलन करून उदघाटन केले.
स्नेहमेळाव्यात विद्यार्थी व पालक यांच्यामधील नाते अधिक दृढ व्हावे. विद्यार्थीच्या कलागुणांना वाव मिळावे. विद्यार्थ्यांना व्यावहारिकदृष्ट्या जगता यावे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला मांडल्या. यामधुन त्याना व्यवहार ज्ञान वाढत जावे. आजच्या जगात ज्याला व्यवहार ज्ञान असेल त्याला जगता येत. म्हणून स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञानाचे धडे शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये मिळाले, असे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांनी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्यात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन शिक्षकासाठी लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मनिषा भोसले यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *