Monday , December 8 2025
Breaking News

आमटे येथे छ. शिवाजी महाराज स्मारकाचे काॅलम भरणी संपन्न

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : आमटे (ता. खानापूर) येथे नविन बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा काॅलम भरणी कार्यक्रम रविवारी दि. २४ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जांबोटी विभाग माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक महादेव गावकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, भाजपचे नेते माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील, भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर, बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, आदिंच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर
माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, मारूती पाटील, तालुका पंचायत माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ, सुरेश देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, चिदंबर गावकर, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, प्रकाश गुरव, अशोक गावकर, नामदेव केसरकर, नागराज शिलावंत आदी मान्यवरांच्या हस्ते देवदेवताचे फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला ऍड. आकाश अथणीकर, करंबळ ग्राम पंचायत उपाध्यक्ष नारायण पाटील, पवन गायकवाड तसेच आमटे ग्राम पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
यावेळी काॅलमचे पुजन माजी आमदार संजय पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना माजी आमदार अरविंद पाटील यांनी आमटे भागातील समस्या जवळून पाहिल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिजंगल भागातील आमटे गावाचा विकास हळूहळू होताना दिसत आहे. गावच्या सौंदर्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाने अधिकच भर पडणार आहे.
तेव्हा गावकऱ्यांनी यास्मारकाची जोपासना योग्यरितीने करत, राहावी असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित पाहुण्याची भाषणे झाली.
कार्यक्रमाला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *