Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात महिला सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे स्वागत

Spread the love


बेळगाव : महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेंगळूरहून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे मंगळवारी बेळगावात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बंगळूर मालगुडी आणि रोटरी ई-क्लब ऑफ बंगळूर सखी यांच्यातर्फे 30 दिवसात 30 जिल्ह्यात 3500 किमी अंतराची बाईक रॅली काढण्यात आली आहे. महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘वुमन सेफ कर्नाटक’चा नारा देत बाइक रॅली काढण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी या बाईक रॅलीचे बेळगावात आगमन झाले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी रोटेरियन व्यंकटेश देशपांडे म्हणाले, यांना बंगळुरूहून आलेल्या या धाडसी महिलांच्या बाइक रॅलीचे स्वागत करताना आनंद होत आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात चमकत आहेत. आमचा रोटरी क्लब त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास सदैव तत्पर आहे.
या रॅलीच्या आयोजक रोटरी ई-क्लब ऑफ बंगळुरू सखीच्या अध्यक्षा राजलक्ष्मी म्हणाल्या, महिला संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रॅली काढली आहे. कोलार, चिक्कबळ्ळापूर, तुमकुर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड मार्गे आज आम्ही बेळगावात आलो. आम्ही राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहोत. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा पुष्पा पर्वतराव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *