खानापूर : हेब्बाळ ग्राम पंचायत पीडिओ आरती अंगडी यांच्या बदलीची मागणी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासदांनी मिळून केली आहे. पीडिओ आरती अंगडी या मनमानी कारभार करतात. कोणत्याही प्रकारची सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन अंगणवाडी साहित्य, पवित्र होमसाठी लागणारे साहित्य आणि इतर साहित्य खरेदी केले आहे. याबद्दल ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्यांनी जाब विचारला असता उर्मटपणाने उत्तर देत आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप पीडिओ अंगडी यांच्यावर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात असा आरोप करत सीईओ बेळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात अली आहे.
खानापूर तालुक्याचे युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. मल्लवा चंदू मादार, उपाध्यक्ष श्री. रवींद्र बाळाराम सुतार, सदस्य श्री. परशराम घाडी, श्री. संजय पाटील, सौ. गीता गंगाराम कोलकार, श्री. दिलीप चन्ने वाडकर, श्री. प्रकाश गुरव, सौ. रुपाली आप्पाजी हाडलगेकर, सौ. शीतल मष्णू मडवळकर, सौ. नंदा नागो केसरकर, सौ. अंकिता संदीप सुतार, सौ. पुष्पा पुंडलिक आळवणी, सौ. वैष्णवी विष्णू खतवकर यावेळी हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta