खानापूर : खानापूर शहरातील एका इलेक्ट्रिकल दुकानातून वायरचे बंडल चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे.
गेल्या आठवड्यात खानापूर शहरातील नवीन बसस्थानकाजवळील दुर्गामाता ट्रेडर्स या इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानातून वायरचे बंडल चोरीला गेले. या प्रकरणी चोरट्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी चोरट्याला वायरचे बंडल, गुन्ह्यात वापरलेले मुद्देमाल आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. या कारवाईत पीएसआय शरणेश जालिहाळ, हवालदार जयराम हम्मण्णावर, ईश्वर जिन्नवगोळ, शिवकुमार बळ्ळारी, शिवकुमार तुरमंडी, बाळेशी यांनी भाग घेतला.