
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर ता. पं. कार्यालयाच्या महापालिका घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत 51 ग्रामपंचायतींना मंगळवारी घनकचरा विल्हेवाटीची वाहने सुपूर्द करण्यात आली. आ. डॉ अंजली निंबाळकर यांच्या हस्ते वाटपाचा शुभारंभ झाला.
शहाराप्रमाणे आता गावोगावी कचरा विल्हेवाट करण्यासाठी 15th फायनान्स योजनेअंतर्गत तालुक्यातील 51 ग्रामपंचायती पैकी 44 ग्रामपंचायतींना चार चाकी गाड्यांचे वितरण करण्यात आले. सात पंचायतींना गाड्या मिळाल्याने त्यांचे कचरा विल्हेवाटचे कार्य सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागांतील आरोग्याच्या समस्या कमी होणार असल्याचे सांगितले. आ. डॉ. निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत घनकचरा विल्हेवाटीची वाहने ग्रामपंचायतींना सुपूर्द करण्याच्या समारंभात बोलताना स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व तसेच या योजनेची संपूर्ण माहिती दिली. ग्रामपंचायत अध्यक्षांच्या उपस्थितीत वाहनाच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी सर्व ग्रामपंचायतीचे पीडिओ, अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta