
खानापूर (विनायक कुंभार) : जुलमी कर्नाटक शासनाच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांकांचे हक्क मिळविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितिच्या नेतृत्वात दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. कर्नाटक सरकारचा भाषिक अल्पसंख्याक1981 च्या कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषिकांबरोबर इतर भाषिक 15% पेक्षा अधिक असतील तर कन्नड बरोबरच त्यांच्या भाषेतही सरकारी परिपत्रके व कागदपत्रे मिळाली पाहिजे. यासाठी आंदोलनास खानापुरातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर शिवसेनेचे मोहन गुरव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta